Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

लाजून हासणे अन्‌....

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे



गीत - मंगेश पाडगावकर
ंगीत - श्रीनिवास खळे
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
ाग - पहाडी (नादवेध)
Disclaimer